ठाणे – शहरातील कोरोनाचा अंत आता जवळ आला आहे. आज शहरात २२ नवीन रुग्णांची भर पडली असून ३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सहा प्रभाग समिती क्षेत्रात नवीन एकही रूग्ण सापडला नसून एकही मृत्यूची नोंद झाली नाही.
ठाणे महापालिका हद्दीतील वर्तकनगर, उथळसर, वागळे, कळवा, मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रात एकही रूग्ण सापडला नाही तर सर्वात जास्त १९ रुग्ण माजीवडा मानपाडा प्रभाग समिती परिसरातील आहेत. दोन रूग्ण नौपाडा कोपरी क्षेत्रातील तर एक रुग्ण लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्रातील आहे,विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रूग्णांपैकी ३२ जण रोग मुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८१ हजार ८१ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. तर रुग्णालयात आणि घरी १९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकही रूग्ण आज दिवसभरात दगावला नाही. आत्तापर्यंत दोन हजार १२७ जण मृत्युमुखी पडले आहेत. महापालिका प्रशासनाने काल शहरातील एक हजार ३१३ नागरिकांची कोरोना चाचणी केली आहे. त्यामध्ये २२ रूग्ण बाधित असून आत्तापर्यंत २३ लाख ७८ हजार ५११ ठाणेकरांची चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये एक लाख ८३ हजार ४०० जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत.