जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रुग्ण शून्य

ठाणे : जिल्ह्यातील कोरोनाच्या नवीन रूग्ण वाढीची पाटी कोरीच राहिली आहे तर सक्रिय रूग्ण ११ झाले आहेत.

जगात कोरोनाचा कहर सुरू आहे. देशात आणि राज्यात कोरोना वाढीचा वेग मंदावला आहे तर जिल्ह्यात आजही एकही रूग्ण सापडला नाही.

आत्तापर्यंत सात लाख ४७,३९४जण बाधित सापडले आहेत. रुग्णालयात आणि घरी जिल्ह्यात ११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर ठाण्यात चार जण सक्रिय आहेत. आत्तापर्यंत सात लाख ३६,१८०जण कोरोनामुक्त झाले आहेत तर जिल्ह्यात ११,९६९जणांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यात २,१६४ जण दगावले आहेत.