झी मराठी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार एक धमाकेदार कुकरी शो किचन कल्लाकार

संकर्षण कऱ्हाडे सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

झी मराठीवरील प्रत्येक कार्यक्रम हा प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करतो आणि त्यातील कलाकार हे देखील प्रेक्षकांना आपलेसे वाटतात. असाच एक कलाकार म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. तो अभिनेता, कवी, लेखक अशा अनेक भूमिका निभावताना प्रेक्षकांना दिसतो, पण आता संकर्षण सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

झी मराठीवर ‘किचन कल्लाकार’ हा नवीन कुकरी शो प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून त्याचा टिझर नुकतंच वाहिनीवर सादर झाला. यामध्ये संकर्षण म्हणताना दिसतोय की, आता भल्या भल्या कलाकारांची शिट्टी वाजणार आणि मनोरंजनाची चव वाढणार. यावरून तर असंच दिसत की पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांचा या किचन मध्ये कस लागणार आहे. आता के कलाकार किचन मध्ये कसा कल्ला करणार हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे.

हा कुकींगशी संबंधीत शो पाहण्यासाठी सर्वंजण उत्सुक आहेत. या शोची रचना काय आहे संकर्षण सोबत अजून या शो मध्ये कोण असणार याबाबत काहीच माहिती समोर आलेली नाही. मात्र संकर्षणला या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.