झी मराठीचा आहेर थेट लग्नसोहळ्यात

सोलापूरमधील नवदाम्पत्याला लग्नात भेट केला गेला झी मराठीचा आहेर

झी मराठी नेहमीच वेगवेगळ्या धाटणीचे कार्यक्रम प्रेक्षकांसाठी सादर करून त्यांचं भरगोस मनोरंजन करते. यावेळी ‘बँड बाजा वरात’ नावाचा असाच एक अनोखा कार्यक्रम ही वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आली. लग्नसराई सुरु असताना, लग्नघरात झी मराठीचा आहेर थेट पोहोचला. हो हे खरं आहे.

नुकतंच एका नवं दाम्पत्याला झी मराठी वाहिनीने त्यांच्या लग्नात त्यांना आहेर भेट केला.देवमाणूस मालिकेतील डिम्पल आणि डॉ.अजितकुमार देव यांनी ‘बँड बाजा वरात’ या कार्यक्रमात नुकतीच हजेरी लावल्याचे प्रेक्षकांनी पाहिले, निमित्त होतं या दोघांच्या मालिकेतील लग्नाच्या विशेष भागाचं. यात या दोघांना झी मराठीचा आहेर मिळाला. हाच झी मराठीचा आहेर देवमाणूसची टीम सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीतील नवदांपत्य ऋतुजा आणि प्रदीप यांना त्यांच्या लग्नाच्या दिवशी आदित्यकृष्ण मंगल कार्यालय उपळाई रोड बार्शी येथे दिला. झी मराठीकडून आणि देवमाणूसच्या संपूर्ण टीम कडून या नवदांपत्यांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा देखील दिल्या. आपल्या लग्नात झी मराठीचा आहेर पाहून या नवदांपत्यांच्या आनंदाला उधाण आलं.