डोंबिवली : एका 18 वर्षीय तरुणीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका येथील त्रिमूर्तीनगर परिसरात बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली.
तरुणीच्या मोठ्या भावाने जास्त मोबाईल बघू नकोस असे सांगत तिच्या मोबाईलचे सिमकार्ड काढून घेतले. त्यानंतर तिचा भाऊ बाजूच्या घरात गेला. काही वेळाने त्याने राहत्या घराचा दरवाजा ठोठावला. मात्र घरातून बहिणीने आवाज दिला नसल्याने त्याने घरातील खिडकीतून पाहिले असता किरण हिने छताच्या अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून लटकलेल्या अवस्थेत दिसला. भावाने आजूबाजूला लोकांना आवाज देऊन बोलावून घेतले आणि दरवाजा तोडून आत गेला. डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे.