ठाणे : मुंबईतील वंडर किडझ लर्निंग अकॅडमीसाठी भारतात पहिल्यांदाच २१ जुलै, २०२४ रोजी रेडिसन ब्लू मुंबई येथे अबॅकस आणि मेंटल मॅथ्स आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती.
या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये श्रीलंका, पनामा, इंडोनेशिया, मलेशिया, दक्षिण आफ्रिका, इराण, तैवान आणि भारत अशा एकूण नऊ देशांतील २४३ मुलामुलींनी भाग घेतला होता.
आंतरराष्ट्रीय स्तरावर वागळे इस्टेट येथील श्रीनगर विभागात राहणारा यश परब हा शेरॉन स्कुल, मुलुंड, मुंबई इयत्ता ७ वी या विद्यार्थ्यांने एआयएमए-अबॅकस ऑलिम्पियाड आंतरराष्ट्रीय स्पर्धा २०२४ (गट-इ) मध्ये तृतीय क्रमांक पटकावला आणि जोयल जॉब हा सेंट पायस स्कुल, मुलुंडचा विद्यार्थी याने (गट-फ) मधून व्दितीय क्रमांक पटकावला.
या दोन्हीही विद्यार्थ्यांनी श्रीनगर येथील योगिता राणे यांच्या मार्गदर्शनाखाली घवघवीत यश प्राप्त केले.