9 डिसेंबर रोजी मुंबईतील ग्रँड हयात येथे वूमन्स प्रीमियर लीगच्या (WPL) दुसऱ्या सत्रासाठी खेळाडूंचा लिलाव होत असताना एकूण 165 खेळाडूंचा सहभाग असेल. 165 खेळाडूंपैकी BCCI ने पुष्टी केली आहे की 104 भारतीय आहेत आणि 61 परदेशी आहेत, ज्यात 15 सहयोगी राष्ट्रांचे आहेत. पाच संघांसाठी 30 स्लॉट उपलब्ध आहेत, त्यापैकी नऊ परदेशातील खेळाडूंसाठी राखीव आहेत.
संघ | संघातील खेळाडू | परदेशी खेळाडू | खर्चित पैसे (₹) | शिल्लक रक्कम (₹) | उपलब्ध स्लॉट | परदेशी स्लॉट |
दिल्ली कॅपिटल्स | १५ | ५ | ११.२५ कोटी | २.२५ कोटी | ३ | १ |
गुजरात जायंट्स | ८ | ३ | ७.५५ कोटी | ५.९५ कोटी | १० | ३ |
मुंबई इंडियन्स | १३ | ५ | ११.४० कोटी | २.१० कोटी | ५ | १ |
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर | ११ | ३ | १०.१५ कोटी | ३.३५ कोटी | ७ | ३ |
यूपी वॉररीझ | १३ | ५ | ९.५० कोटी | ४.०० कोटी | ५ | १ |
गुजरात जायंट्सना जास्तीत जास्त खरेदी करावी लागेल कारण त्यांच्याकडे 10 स्लॉट उपलब्ध आहेत, त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (7), आणि गतविजेते मुंबई इंडियन्स (5) आणि यूपी वॉररीझ (5) आहेत. गेल्या आवृत्तीची उपविजेती दिल्ली कॅपिटल्सला जास्ती कष्ट घ्यावे लागणार नाहीत कारण त्यांना फक्त तीन खेळाडूंची आवश्यकता आहे.
कुठल्या परदेशी खेळाडूवर लक्ष ठेवायचे?
शबनिम इस्माईल: दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज महिला क्रिकेटमधील सर्वात वेगवान गोलंदाज आहे. वेगाव्यतिरिक्त, तिच्याकडे उत्कृष्ट बाउन्सर आहेत. महिलांच्या आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ती अव्वल पाच विकेट घेणाऱ्या खेळाडूंमध्ये आहे. जरी तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यापासून निवृत्त झाली असले तरी, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमधील फ्रेंचायझी क्रिकेट स्पर्धांमध्ये ती चमकत आहे. या वर्षीच्या इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या द हंड्रेडमध्ये बर्मिंगहॅम फिनिक्सविरुद्ध वेल्श फायरसाठी तिने घेतलेली हॅट्ट्रिक आठवते?
डिआंड्रा डॉटिन: महिलांच्या आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील पहिले शतक झळकावणारी खेळाडू म्हणजे डिआंड्रा डॉटिन. यात क्वचितच शंका आहे की वेस्ट इंडीजची ही आक्रमक फलंदाज कुठल्याही मैदानावर क्रिकेटच्या चेंडूला आलेल्या दर्शकांमध्ये पोहचवू शकते. WPL च्या पहिल्या आवृत्तीत तिला गुजरात जायंट्सने निवडले होते परंतु फ्रँचायझीने तिला स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच वैद्यकीय कारणास्तव सोडले, ज्यामुळे तिने विवाद केला. गुजरात जायंट्स पुन्हा तिच्यात रस दाखवेल का?
डॅनिएल वायट: मागील लिलावात कुठल्याही संघाने तिला निवडले नाही. इंग्लंडच्या सलामीच्या फलंदाजाने आगामी 2024 WPL लिलावापूर्वी वानखेडे स्टेडियमवर 6 डिसेंबर रोजी इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात 47 चेंडूत 75 धावा करून स्वत:साठी एक मजबूत केस बनवली आहे. हा सामना तिची 150 वी आंतरराष्ट्रीय टी-२० देखील होती. पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारी ती एकमेव इंग्लंडची खेळाडू आहे आणि महिला टी-२० मध्ये हा मान मिळवणारी ती फक्त तिसरी क्रिकेटपटू आहे. तिच्या मागील मुलाखतींमध्ये, तिने आरसीबी फ्रँचायझीसाठी तिची आवड व्यक्त केली आहे. काय यावेळी आरसीबी वायटला स्वीकारेल का?
कुठल्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूंवर लक्ष ठेवायचे?
उमा चेत्री: ती आसाममधील एक रोमांचक प्रतिभा आहे, जी नुकत्याच संपलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत इंग्लंड अ विरुद्ध भारत अ साठी प्रभावी ठरली होती. सलामीवीर आणि यष्टिरक्षक म्हणून, 21 वर्षीय खेळाडू कोणत्याही WPL फ्रँचायझीसाठी किफायतशीर पर्याय असू शकते. ती तिच्या आक्रमक फलंदाजीसाठी आणि सुरक्षित यष्टिरक्षणासाठी ओळखली जाते. या वर्षाच्या सुरुवातीला, जेव्हा भारताने बांगलादेशचा दौरा केला, तेव्हा ती भारतीय संघात निवडली जाणारी आसाममधील पहिली महिला ठरली.
काशवी गौतम: चंदीगडची ही उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज 29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत इंग्लंड अ विरुद्ध खेळलेल्या भारत अ संघाचा भाग होती. या वर्षीच्या सिनियर महिला टी-२० स्पर्धेत तिने 12 बळी घेतले आणि 112 धावा केल्या. तिला नॉर्थ झोन संघात देखील समाविष्ट करण्यात आले आणि आंतर-झोनल टी-20 स्पर्धेदरम्यान तिने हॅट्ट्रिक साधली. फेब्रुवारी 2020 मध्ये अंडर 19 एकदिवसीय सामन्यात 10 विकेट घेणारी पहिली भारतीय बनल्यानंतर, तिने आतापर्यंत सुंदर कामगिरी केली आहे.
पूनम खेमनार: WPL 2023 साठी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने तिला निवडले होते. परंतु, या वर्षीच्या लिलावापूर्वी तिला फ्रँचायझीने सोडले. या 29 वर्षीय खेळाडूला महाराष्ट्र आणि नागालँडकडून खेळण्याचा अनुभव आहे. नागालँडसोबतच्या कारकिर्दीत, सिनियर महिलांच्या एकदिवसीय सामन्यात शतक ठोकणारी ती पहिली खेळाडू ठरली. सध्या ती मध्य प्रदेशकडून खेळते आणि भारतातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक म्हणून गणली जाते. या वर्षीच्या सिनियर महिला T20 ट्रॉफीमध्ये, ती 329 धावांसह तिसरी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती आणि सेंट्रल झोनकडून खेळण्यासाठी तिची निवड झाली.
शीर्ष 10 खेळाडू ज्यांच्यावर लक्ष असेल
फेब्रुवारीमध्ये झालेल्या WPL 2023 खेळाडूंच्या लिलावात डॅनिएल वायट आणि चामारी अथापथू सारखे खेळाडूंना कुठल्याही संघानी निवडले नाही हे पाहून आश्चर्य वाटले. तथापि, आगामी लिलावात त्यांची निवड होण्याची दाट शक्यता आहे.
वायट चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तिने भारत दौरा अर्धशतक ठोकून शानदार प्रकारे सुरु केला आहे. दुसरीकडे अथापथूने ऑस्ट्रेलियातील WBBL गाजवले. या श्रीलंकेच्या कर्णधाराने 552 धावा करून दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावा करणारी खेळाडू बनली आणि नऊ विकेट्स देखील घेतल्या.
खेळाडू | प्राविण्य | देश | बेस प्राईस |
फिबी लिचफिएल्ड | सलामीवीर | ऑस्ट्रेलिया | ₹३० लाख |
डॅनिएल वायट | सलामीवीर | इंग्लंड | ₹३० लाख |
चामारी अथापथू | अष्टपैलू | श्रीलंका | ₹३० लाख |
डिआंड्रा डॉटिन | अष्टपैलू | वेस्ट इंडिस | ₹५० लाख |
शबनिम इस्माईल | वेगवान गोलंदाज | दक्षिण आफ्रिका | ₹४० लाख |
काशवी गौतम | वेगवान गोलंदाज | भारत | ₹१० लाख |
देविका वैद्य | अष्टपैलू | भारत | ₹३० लाख |
पूनम खेमनार | अष्टपैलू | भारत | ₹१० लाख |
अश्वनी कुमारी | अष्टपैलू | भारत | ₹१० लाख |
उमा चेत्री | यष्टिरक्षक-सलामीवीर | भारत | ₹१० लाख |