जागतिक पुरुष बॉक्सिंग स्पर्धा : निशांत, संजीत उपांत्यपूर्व फेरीत

बेलग्रेड : भारताच्या निशांत देव (७१ किलो) आणि संजीत (९२ किलो) यांनी पुरुषांच्या जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अन्य तीन भारतीय बॉक्सिंगपटूंचे आव्हान मात्र संपुष्टात आले.

निशांतने मेक्सिकोच्या मार्को अल्वारेझ व्हेर्देवर ३-२ अशी मात केली. पुढील फेरीत त्याचा रशियाच्या व्हादीम मुसाएव्हशी सामना होईल. आशियाई विजेत्या संजीतने जॉर्जियाच्या गिओर्गीला ४-१ अशी धूळ चारत अंतिम आठमध्ये प्रवेश निश्चित केला. आता त्याच्यापुढे इटलीच्या अझीझ अब्बास मौहिदिनचे आव्हान असेल.

अन्य उपउपांत्यपूर्व लढतींत, रोहित मोरला (५७ किलो) कझाकस्तानच्या सेरीक तेमिर्झानोव्हने १-४ असे, आकाश सांगवानला (६७ किलो) क्युबाच्या केव्हिन ब्राऊन बझैनने ०-५ असे, तर सुमित कुंडूला (७५ किलो) योएनलिस हर्नांडेझने ०-५ असे पराभूत केले.