ग्रामपंचायत सुरई-सारंग महिला मंडळ बचत गटांतर्फे महिला सक्षमीकरण शिबीर 

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील  सुरई-सारंग ग्रामपंचायत, महिला मंडळ, महिला बचत गट यांच्या माध्यमातून प्रथमच सरपंच रेखा पाटील व केंद्रीय कामगार शिक्षण बोर्ड (श्रम व रोजगार मंत्रालय) भारत सरकार तसेच छत्रपती शिवबा प्रतिष्ठान भिवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरण शिबिर आर्थिक सहाय्यसह मंगळवार ८ ते ९ फेब्रुवारी २०२२ रोजी उत्साहात पार पडले.

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार प्रदीप मुन, ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबई गजानन पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.शांतीदास लुंगे, महिला उद्योजिका सुनिता गुरव यांनी उपस्थित महिलांना मागदर्शन केले. महिला सक्षमीकरण शिबीरात सहभागी महिलांना बचत गटाचे महत्व, घरगुती व्यवसाय करण्यासाठी लघुउद्योग प्रात्यक्षिक, महिलांसाठी सरकारी योजना, महिला आरोग्याविषयी, ग्राहक फसवणुकीबाबत तज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन करण्यात आले. सहभागी ८० महिलांना दोन दिवसाचा शिबिर भत्ता म्हणून प्रती महिला ५०० रुपये केंद्रिय कामगार शिक्षण बोर्ड श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्फत देण्यात आला. महिलांसाठी फरफ्युम तसेच कागदी पिशव्या बनविण्याचे प्रात्यक्षिक संगिता गुरव यांनी केले तर ग्राहकांची होणारी फसवणूक असली नकली वजन मापे, फसव्या जाहिराती, अन्न भेसळ प्रात्यक्षिक, यावर गजानन पाटील यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमासाठी सरपंच रेखा पाटील, छत्रपती शिवबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय भामरे, समाजसेवक विजय पाटील, समाजसेवक दत्ता पाटील, उपसरपंच विशाल पाटील, ग्रा.पं.सदस्या पुनम पाटील, मोहना पाटील, बेबी पाटील, मोनिका पाटील, नीलकमल पाटील, ग्रामसेवक अनिल दांडेकर तसेच इतर उपस्थित होते. महिला सक्षमीकरण कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल समाजसेवक दत्ता पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.