भाईंदर: भाईंदर पश्चिमेच्या उत्तन, पातान बंदर, स्मशानभूमीजवळ एका घराच्या स्लॅबचे प्लास्टर पडून महिलेचा मृत्यू झाला तर घरातील चार जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
भाईंदर पश्चिमेच्या उत्तन, पातान बंदर, स्मशानभूमी जवळ डेनिस जॉन बॉर्जिस यांच्या घराचा स्लॅबचे प्लास्टर पडून कुटुंबातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दवी घटना घडली आहे. शुक्रवारी पहाटे सव्वा चार वाजता ही घटना घडली आहे. बॉर्जिस यांचे हे घर अंदाजे २० वर्षे जुने आहे. त्या घरामध्ये त्यांच्या कुटुंबातील पाच जण झोपले होते. घरातील स्लॅबचे प्लास्टर अंगावर पडल्याने सुनीता बॉर्जिस (४६) यांचा मृत्यू झाला. घरातील इतर चार व्यक्ती स्नेहल बॉर्जिस (२५), स्वेता बॉर्जिस (१७), सानिया बॉर्जिस (१३) व डेन्सी बॉर्जिस (२२) यांना दुखापत झालेली आहे. जखमी व्यक्तींना रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून घर पुर्णपणे रिकामे करण्यात आले आहे.
घटना घडल्यानंतर अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे आणि इतर आठकर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना मदत केली.