महविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांना व्यक्त केला विश्र्वास
ठाणे : महाविकास आघाडी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी नवी मुंबईत प्रचाराचा धडाका लावला आहे. एरोली येथील प्रसिद्ध असलेल्या गणपतीचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरूवात करण्यात आली. गणेशाच्या कृपेने नवी मुंबईकर नक्कीच साथ देतील असा विश्वास यावेळी विचारे यांनी व्यक्त केला.
नवी मुंबईतील नवीन दिघा रेल्वे स्थानक, बेलापूर प्रवासी जेटी, ऐरोली-काटई मार्ग, घणसोली-ऐरोली जोड रस्ता यासारखे प्रकल्प मार्गी लावण्यात यश मिळवले असल्याचे सांगत राजन विचारे यांनी प्रचाराला सुरुवात केली. नवी मुंबईतील ईश्वर नगर, आनंद नगर, राम नगर, साठे नगर, संजय गांधी नगर, दिघा गाव, विष्णु नगर, ऐरोली नाका, छत्रपती नगर, श्रीराम विद्यालय, पॅराडाईज चौक, तळवली गाव, रबाळे, पंचशिल नगर, महात्मा गांधी नगर, साठे चौक या भागात विकासाचा प्रचाररथ फिरला. यावेळी जागोजागी स्थानिक आगरी कोळी बांधवांनी जोरदार स्वागत करीत आम्ही महाविकास आघाडीच्या मागे उभे आहोत असा विश्र्वास दिला.
राज्यात महविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव तयार केला. मात्र केंद्र सरकारने अद्याप कोणतीही पाऊले उचलली नाहीत. भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी मी नेहमीच कटिबध्द राहिलो असून विमानतळाला दि.बा. पाटील यांचेच नाव देणार असा शब्द विचारे यांनी स्थानिकांना दिला.