फलकबाजीचा फुगा फुटणार ?

विषय तसा जुनाच आहे, परंतु तरीही ठाणे महापालिकेने त्यात लक्ष घातले आहे. या नव्या प्रयत्नांना अपेक्षित यश यावे अशी इच्छा ज्यांना शहर सुंदर असावे असे वाटत असते त्यांना नक्कीच असणार. अर्थात प्रशासकीय उपाययोजनांना राजकीय समर्थन मिळाले तरच विद्रुपीकरणाच्या विळख्यातून ठाणे शहराची मुक्तता होऊ शकेल.