दादर फलाटाचे रुंदीकरण; ठाणे-कल्याण सेवेवर परिणाम

Thanevaibhav Online
13 September 2023

ठाणे : येत्या 5 सप्टेंबर 2023 पासून दादर फलाट क्रमांक 1 च्या रुंदीकरणाच्या पायाभूत सुविधांच्या कामासाठी, दादर स्थानकावरून टर्मिनेशन/ओरिजनेट गाड्या परळपर्यंत वाढवल्या जातील आणि या सेवा परळ येथून सुरू होतील. त्यामुळे दादर आणि परळहून सुटणा-या लोकल ठाणे, डोंबिवली, कल्याण या मार्गांवर धावतील.

गर्दीचे उत्तम व्यवस्थापन आणि:प्रवाशांच्या प्रवासाच्या सोयीसाठी दादर फलाट क्र. 1 च्या फलाटाची रुंदी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फलाट क्र. 1 ची सध्याची लांबी 270 मीटर आणि रुंदी 7 मीटर आहे. सध्याची रुंदी 7 मीटरवरून 10.5 मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रुंदी अतिरिक्त 3.5 मीटरने वाढेल. हे काम 15 सप्टेंबर 23 (शुक्रवार) पासून सुरू होईल. 1 कोटी रुपये खर्चून हे काम पुढील 2 महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

या रुंदीकरणाच्या कामांमुळे ठाणे, डोंबिवली, कल्याण, टिटवाळाहून परळ, दादरकडे जाणा-या आणि दादरहून ठाणे ते कल्याण व टिटवाळाकडे जाणा-या लोकल सेवांवर परिणाम होणार आहे. ही पायाभूत सुविधा सुधारण्याची कामे चांगल्या उद्यासाठी आहेत, असा मध्य रेल्वेचा दावा आहे.