पाणथळ क्षेत्र बचाव मोहीम, सलग सहाव्या रविवारी आंदोलन

नवी मुंबई : नेरूळ चाणक्य मागील पाणथळ क्षेत्र तलाव बुजवून  या ठिकाणी टोलेजंग इमारती बांधण्याचा घाट सिडकोच्या मदतीने घालण्यात आला आहे.त्यामुळे सदर पाणथळ क्षेत्र वाचावे म्हणून येथील स्थानिक पर्यावरण प्रेमी व  सेव्ह नवी मुंबई इंव्हायरोमेंट संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने  दर रविवारी आंदोलन करण्यात येते.
सीवूड्स येथील टी एस चाणक्य सागरी प्रशिक्षण संस्थेच्या मागे असलेला चाणक्य तलाव हा मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने संरक्षित क्षेत्र केलेला आहे. परंतु या तलावाकडे सिडको जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. भरती – ओहोटी प्रभावित, १४.७४ हेक्टर क्षेत्र व्यापलेला चाणक्य तलाव आणि त्याच्या आजूबाजूचे खारफुटीचे क्षेत्र सिडकोच्या अधिपत्याखाली येते. या परिसरातील संपूर्ण ३२ हेक्टर क्षेत्र बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन तेथील तलाव बुजवून टोलेजंग १७ टोलेजंग इमारती बांधण्याचा घाट सिडकोच्या मदतीने सुरु असल्याचा दावा निसर्गप्रेमी यांनी केला  आहे.तर मुंबई उच्च न्यायालयाने सिडकोला आपल्या ताब्यातील सर्व खारफुटी प्रदेश वनविभागाच्या कांदळवन कक्षाकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश देऊनही, सिडकोने जाणीवपूर्वक संपूर्ण ठाणे खाडी हस्तांतरण करण्यास टाळाटाळ करत असून खासगी विकसकांच्या मार्फत अनधिकृतपणे तलाव बुजवण्याचा प्रकार सुरु आहे. याविरोधात दर रविवारी निसर्गप्रेमीं चाणक्य तलाव वाचवण्यासाठी आंदोलन करत आहेत.यावेळी  धर्मेश बाराई आणि त्यांच्या खारफुटीच्या कार्यकर्त्यांची टीम, अमिताभ सिंग, भारतभूषण गुप्ता, समीर बागवान, रेखा शंखला, डीके जैन, हरीश इंगवले, सुजाता, विवेक काकडे आदी पर्यावरण प्रेमी हजर होते.
काय आहेत मागण्या
१)राष्ट्रीय पाणथळ क्षेत्रात  नमूद केलेल्या सर्व पाणथळ जमिनी राज्य पाणथळ प्राधिकरणाकडे सुपूर्द करा.
२). उर्वरीत खारफुटी खारफुटी  कांदळवन कक्षाकडे त्वरित सुपूर्द  करा.
३). वैयक्तिक फायद्यासाठी खारफुटी नष्ट करण्याच्या कटात सहभागी बिल्डर आणि अधिकाऱ्यांसह दोषींना शिक्षा करा.
४) मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करून चाणक्य तलावावर १७  इमारतींना परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांना अटक करा.