ठाणे : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मनोरंजन, पर्यटन आणि जल्लोष होत असताना ठाण्यात मात्र दरवर्षीप्रमाणे रक्तदानाचा अनोखा उपक्रम सुरू होता.
शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांनी सुरू केलेली रक्तदान आजही तेवढ्याच उत्साहात जपली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमाला नुसतीच भेट दिली नाही तर रक्तदानही करत आदर्श निर्माण केला. या उपक्रमामध्ये ४३५ पिशव्या रक्त संकलित झाले आहे.
शिवाजी मैदान येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी महापौर आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के, शहरप्रमुख हेमंत पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनीही रक्तदान करत ठाणेकरांना प्रोत्साहित केले. दरम्यान रक्तदान करणार्या दात्यांच यावेळी रक्तकर्ण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
रक्तदान हे जीवनदान आहे. म्हणूनच या उपक्रमाला महत्व आहे. लोक वेगवेगळ्या पद्धतीने ३१ डिसेंबर साजरा करतात. पण रक्तदान करून सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करणारा हा उपक्रम हा एकमेव असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.