ठाणे : ठाणे शहरातील नौपाडा-कोपरी प्रभाग समिती अंतर्गत कोपरी क्षेत्रातील कन्हैयानगर जलकुंभाला नव्याने बसविण्यात आलेली डाउनटेक पाईप मुख्य वितरण जलवाहिनीला जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. सदरचे काम अत्यंत तातडीचे असल्याने बुधवारी सकाळी ९. ते गुरुवार सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तास कन्हैयानगर जलकुंभावरील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
या शटडाऊनमुळे कन्हैयानगर जलकुंभा अंतर्गत कोळीवाडा, सुदर्शन कॉलनी, साईनगर, नातु कॉलनी, सावरकर नगर, वाल्मिकीपाडा सोसायटी, कुंभारवाडा, गुरुदेव सोसायटी, कृष्णानगर व स्वामी समर्थ मठ परिसर इद्यादी परिसराचा पाणी पुरवठा पुर्णपणे बंद राहणार आहे. पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.