ठाणे : ठाणे महानगरपालिका स्वतःच्या पाणीपुरवठा योजने अंतर्गत सोनाळे जंक्शन ते कल्याण फाटा जंक्शनपर्यंत महापालिकेच्या दोन मुख्य जलवाहिन्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ च्या रुंदीकरणामध्ये बाधीत होत आहेत. त्यामुळे या कामात अडथळा येत असून सदरचे काम करणे अत्यंत आवश्यक आहे.
याअनुषंगाने महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेच्या बुधवार २० मार्च २०२४ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत असा १२ तासांसाठी एक जलवाहिनी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे शहराला पुरविण्यात येणारा पाणी पुरवठा ३० टक्याने कमी होणार आहे. त्याअनुषंगाने ठाणे शहरातील विविध ठिकाणी झोनींग करुन पाणीपुरवठा सुरु ठेवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
वरील शटडाऊन मुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.