दुरुस्ती कामामुळे ठाण्यात शनिवारी कमी दाबाने पाणीपुरवठा

ठाणे : ठाण्यास पाणी पुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणाच्या जलवाहिनीमध्ये गळती सुरू झाली आहे. ही गळती थांबण्यास काही काळ लागणार आहे. त्यामुळे, ठाणे महापालिका क्षेत्रात शुक्रवार,१८ एप्रिल, २०२५ आणि शनिवार, १९ एप्रिल, २०२५ रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

शुक्रवार, १८ एप्रिल, २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता जल वाहिनीमध्ये गळती सुरू झाली. ही गळती दुरुस्त करण्याचे काम स्टेम कंपनीमार्फत तातडीने हाती घेण्यात आले आहे. दुरुस्तीच्या कामासाठी स्टेममार्फत होणारा पाणीपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे.

दुरुस्तीचे काम पूर्व झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी लागणारा अवधी लक्षात घेऊन त्या काळात, मुंब्रा रेतीबंदर, कळव्याचा काही भाग, खारेगाव, साकेत, राबोडी, उथळसर, खोपट, घोडबंदर रोड, गांधीनगर, पोखरण रोड नं १ व२, इंदिरानगर, चरई, सिद्धेश्वर, भास्कर कॉलनी, घंटाळी येथे कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेचे उपनगर अभियंता (पाणीपुरवठा) विनोद पवार यांनी दिली आहे.