बदलापूर : बदलापूर शहरातल्या तलावातील पाण्याचे शुद्धीकरण करण्याची मोहीम पालिके च्या माध्यमातून हाती घेण्यात येणार आहे. अमृत योजनाच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
या मोहिमेसाठी पर्यटन आणि पर्यावरण विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध होणार आहे. स्वच्छ भारत अभियान आणि अमृत योजनेच्या दसऱ्ु या टप्प्यात बदलापूर नगरपालिका हद्दीतील तीन तलावातील पाण्याचे शुद्धीकरण के ले जाणार आहे. तलावातील पाण्याचे संवर्धन व्हावा आणि ते शुद्ध राहावे या उद्देशाने अमृत योजना 2 ही योजना राबवण्यात येते आहे. या योजनेत बदलापूर शहरातील कात्रप, बदलापूर गाव आणि एरंजाड गावातील तलावांचा समावेश आहे.
मागील काही वर्षांपासून बदलापूर शहरातील सर्वच तलावाची मोठी दरुवस्था झाली आहे. तलावात गाळ आणि जलपर्णीची अच्छादन पसरल्याने तलावातील पाणी अशुद्ध झाले आहे. त्यामुळे तलावाचे सुशोभीकरण नाही झाले तरी तलावातील पाणी स्वच्छ राहावे यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत बदलापूर गावात असलेल्या तलावासाठी 95 लाख 30 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर इतर दोन तलावासाठीही निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती पालिके चे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी दिली आहे. दरम्यान शहरातील तलावासाठी पालिके च्या माध्यमातून यापूर्वी कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र त्यानंतरही तलावांची दराु वस्था झाल्याचे नेहमीच पाहायला मिळत आहे. आता या निधीचा योग्य वापर करून शहरातील तलाव पुनर्जीवित करणे गरजेची बाब झाली आहे. पालिका प्रशासनाने या निधीचा उपयोग करताना त्या कामाचा दर्जा योग्य राखणे गरजेचे आहे. त्यासोबतच तलावातील जीवसृष्टी देखील अबाधित राखणे गरजेचे झाले आहे.