ठाणे: ठाणेवैभव वासंतिक क्रिकेट करंडक स्पर्धेच्या अ गटातील दहावा सामना डाटामेटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस आणि आदित्य बिर्ला ग्रुप या दोन संघात झाला. डाटामेटिक्स संघाने ५६ धावांनी आदित्य बिर्ला संघाचा धुव्वा उडवला.
नाणेफेक जिंकलेल्या डाटामेटिक्स संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि २० षटकांत आठ गडी गमावत २१६ धावांचा डोंगर रचला. नूतन गोयल याने आठ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ६४ धावा फटकावल्या. रोहिदास कोयंडे याने ५१ धावा फटकावल्याच, शिवाय गोलंदाजी करत आदित्य बिर्ला ग्रुप संघाचे तीन बळीही घेतले.
डाटामेटिक्सने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना आदित्य बिर्ला संघाला २० षटकांत फक्त १६० धावा करता आल्या. यात विनय केणे याने दोन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 54 धावा केल्या. उर्वरित फलंदाजांना मात्र चांगली कामगिरी करता आली नाही.