ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मुरबाड पंचायत समितीच्या ग्रामसेवकाने दोन टक्क्यांप्रमाणे २० हजार रुपयांची लाच मागितली होती. १७,५०० रुपयांची लाच स्विकारताना त्याला ठाणे विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
या घटनेतील तक्रारदार यांना नवीन इमारत बांधकामांचे टेंडर मंजूर झाले आहे. त्या कामांचे बील सुमारे २० लाख रुपये मंजूर झाले आहे. त्यातील अर्ध्या कामाची रक्कम १० लाख रुपये तक्रारदारांना देण्यात आले होते. उर्वरित रक्कम नऊ लाख २४,५९५ रकमेचे बील मंजूर करण्याकरीता लोकसेवक यांनी तक्रारदारांकडे दोन टक्केप्रमाणे २० हजार रुपये मागितले.
तक्रारीच्या अनुषंगाने ११ जून २४ रोजी केलेल्या पंचासमक्ष पडताळणी कारवाईत लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन टक्के म्हणजे २० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. ठाणे युनिटच्या सापळ्याने आयोजन करुन ११ जून २४ रोजी दुपारी १५.२० वाजता लोकसेवक याला तक्रारदार यांच्याकडून १७,५०० रुपयांची लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे.