विजय सिंघल सिडकोच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदी

नवी मुंबई : सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांची शासनाने तडकाफडकी बदली केली आहे. त्यांच्या जागी आता बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विजय सिंघल हे १९९७ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय अधिकारी आहेत. ५ जून २०२३ रोजी बेस्टचे महाव्यवस्थापक म्हणून ते रूजू झाले होते. राज्य सरकारमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. महाराष्ट्राचे आणि सहायक जिल्हाधिकारी-मलकापूर, बुलढाणा, सीईओ-झेडपी-अहमदनगर, सीईओ-झेडपी-औरंगाबाद, जिल्हाधिकारी-हिंगोली, जिल्हाधिकारी-जळगाव, महापालिका आयुक्त-कोल्हापूर, साखर आयुक्त-महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त-महाराष्ट्र राज्य म्हणून काम केले आहे. उद्योग आयुक्त-महाराष्ट्र राज्य, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त-बृहन्मुंबई महानगरपालिका, महानगरपालिका आयुक्त-ठाणे आणि अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक-महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.आदी ठिकाणी त्यांनी काम पाहिले आहे.

आता शासनाने त्यांच्यावर सिडकोची जबाबदारी सोपवली आहे. सिडकोपुढे सध्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ,नैना आणि नवीन खोपटा शहर तयार करणे आदी आव्हाने आहेत. ही आव्हाने सिंगल कशी पूर्ण करतील याकडे आता नवी मुंबईकरांच्या नजरा असणार आहेत.