आंतर विश्वविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धा वेदांत जवंजाळने गाजवली

ठाणे: आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयाच्या व ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेचा खेळाडू वेदांत जवंजाळ याने नुकत्याच झालेल्या आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले.

या स्पर्धा किशनचंद चेलाराम कॉलेज कोपरी ठाणे येथे झाल्या. या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
वेदांत मूळचा चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा गावचा असून या आदिवासी खेळाडूने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वेदांत आनंद विश्व विद्यालयाचा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी असून आपल्या यशाचे श्रेय त्याने ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे प्रमुख श्रीकांत वाड तसेच आनंद विश्व गुरुकुल कॉलेजचे प्राचार्य, तसेच क्रीडा शिक्षक सुशांत दिवेकर तसेच डॉ. प्रदीप ढवळ व आकाश ढवळ यांना दिले आहे.

उपांत्य पूर्व फेरीत वेदांत जवंजाळ याने ज्ञानसाधना कॉलेजच्या आदित्य पवारला १५-०९, १५-०७ने पराभूत केले तर उपांत्य फेरीत वेदांतने के.सी. कॉलेजच्या श्लोक अग्रवाल याचा पराभव केला.