भाईंदर : वसई-विरार महानगर पालिकेच्या परिवहन समितीच्या सभापतींची गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली निवडणूक येत्या २ डिसेंबरला होणार आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी पदी जिल्हाधिकारी गोविंद बोडस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वसई-विरार महानगरपालिकेच्या परिवहन समितीच्या सभापतीची निवडणूक गेल्या दोन वर्षांपासून रखडली होती. या समितीमध्ये ११ सदस्य होते. त्यातील सहा सदस्यांची मुदत संपल्याने ते निवृत्त झाले होते. निवृत्त झालेल्यामध्ये विद्यमान सभापती प्रितेश पाटील यांचाही समावेश होता. तर सहा सदस्य राहिले आहेत. तर पालिकेची निवडणूक न झाल्याने निवृत्त झालेल्या सदस्यांच्या ठिकाणी सहा सदस्यांची निवड न झाल्याने अवघ्या सहा सदस्यांमधून सभापती पदाची निवडणूक होणार आहे.
उर्वरित सदस्यांमध्ये भरत गुप्ता, अमित वैद्य, स्वप्नील बाबूसिंग राजपुरोहित, हेमांगी शहा आणि कल्पक पाटील या सदस्यांचा समावेश आहे. यामधून यावेळी कोणाला सभापतीपद ‘बविआ’ कोणाला देते?याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.