आयकर विभागाच्या विशेष कार्यक्रमात आयकर आयुक्तांचे मार्गदर्शन
ठाणे : ठाणे क्षेत्रात पॅन कार्ड धारकांची संख्या आणि सादर झालेल्या आयकर विवरण पत्रांची संख्या यात मोठी तफावत असून आयकर दात्यांची संख्या वाढवण्याबाबत आयकर आयुक्त नासीर अली यांनी मार्गदर्शन केले.
सुनील कुमार सिंग, मुख्य आयकर आयुक्त ,१ ठाणे आयकर विभाग यांनी १६ जानेवारी २०२४ रोजी फेडरेशन ऑफ इंडिअन इंडस्ट्रीच्या वागळे इस्टेट स्थित हॉलमध्ये करदात्यांच्या संखेमध्ये वाढ करणे तसेच त्याची खोली आणि व्याप्ती वाढवणे या विषयावर एक लोकाभिमुख कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमात प्रमुख आयकर आयुक्त पुणे नासीर अली हे प्रमुख पाहुणे व प्रमुख वक्ते म्हणून लाभले होते.
मंचावर मुख्य आयकर आयुक्त सुनील कुमार सिंग ठाणे, प्रधान मुख्य आयकर आयुक्त नासिर अली यांच्याबरोबर आयकर प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष गिरिष राठी, फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीचे प्रमुख अध्यक्ष भालचंद्र रावराणे, सनदी लेखापाल संस्थेच्या ठाणे शाखेचे अध्यक्ष रजनीश शर्मा, लघुउद्योग भारती ठाणे शाखेचे अध्यक्ष उद्योजक राजीव पाटील हे उपस्थित होते.
प्रथम श्री. रावराणे यांनी सर्वांचे स्वागत करून आपले विचार मांडले. त्यानंतर सुनील कुमार सिंग यांनी प्रास्ताविक केले व प्रमुख आयकर आयुक्त नासिर अली यांची ओळख करून दिली. प्रमुख आयकर आयुक्त नासिर अली यांनी कौटिल्याच्या अर्थशास्त्राचा आधार घेऊन विषयाची सुरवात केली. व अतिशय परिणामकारकरित्या व सखोलरित्या मांडणी केली. ठाणे क्षेत्रात पॅनकार्ड धारकाची संख्या व सादर झालेले आयकर विवरण पत्रांची संख्या (इनकम टॅक्स रिटर्न्स) या मधील असेलेली तफावत याबाबत खंत आणि चिंता व्यक्त केली. त्यांच्या मते या संख्येमध्ये वाढ होणे अपेक्षित आहे.
या कार्यक्रमासाठी ठाणे लघुउद्योग अससोसिएशनच्या अध्यक्षा सुजाता सोपारकर, फेडरेशन ऑफ इंडिअन इंडस्ट्रीच्या याचे पदाधिकारी, इंडिअन मेडिकल आसोसिएशनचे ठाणे शाखेचे अध्यक्ष डॉक्टर जोशी, ज्वेलर्स अससोसिएशनचे कमलेश श्रीश्रीमाळ, इतर सनदी लेखापाल, कर सल्लागार असे ऐकून १५० मान्यवर उपस्थित होते.
रजनीश शर्मा यांनी सनदी लेखापाल ठाणे शाखेच्या वतीने आपले विचार मांडले. शेवटी अतिरिक्त आयुक्त अभिषेक सिंग यांनी आभार मानले. सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमांस आयकर अतिरिक्त आयुक्त, सह आयुक्त, उपायुक्त, आयकर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयकर अधिकारी सौ शिला यांनी केले. आभार प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी आयकर सहआयुक्त अशोक जाखनवाल यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना सनदी लेखापाल संजीव ब्रह्मे, नवीन देढिया, भरत सचदेव, राजेश आठवले, महावीर जैन, अविनाश जैन, कर सल्लागार सुनील खुशलानी, उद्योजक श्री. दाते, श्री. बोरवणकर तसेच सनदी लेखापाल संस्थेच्या ठाणे शाखेने मोलाची मदत केली.