आता ११११ झाडे लावण्याचा संकल्प
अंबरनाथ : आता ११११ झाडे लावण्याचा संकल्प लोकसहभाग आणि श्रमदानाच्या माध्यमातून सुरु असलेल्या वालधुनी नदीच्या संवर्धन आणि स्वच्छतेने आता कमालीचा
वेग घेतला आह.ेस्वच्छ आणि सुंदरतेकडे वाटचाल करणाऱ्या वालधुनी नदीकिनारी आता एक हजार १११ झाडे लावण्याचा संकल्प नगरपालिका प्रशासनाने घेतला आह. े याकामी नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी वैयक्तिक १०१ रोपे देण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
अंबरनाथच्या हद्दीमध्ये उगम पावणाऱ्या वालधुनी नदीला पूर्ववत आणण्याच्या दृष्टीन नगरपाल े िकेच्या वतीने लोकसहभाग आणि श्रमदानाच्या माध्यमातून १४ फेब्रुवारीपासून ५ जून २०२२ पर्यंत नदीपत्रासह नदीकिनारा स्वच्छता करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. मातोश्री ट्रस्टने याकामी मोठा पुढाकार घेतला आह. तस े ेच वालधुनी बिरादरीसारख्या असंख्य सवाभाव े ी संस्था, काकोळे ग्रामस्थ, पालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी नदी स्वच्छता मोहिमेत हिरीरीने भाग घेत आहेत, सुहासिनी अधिकारी शाळा आणि गोखले रहाळकर शाळेच्या विद्यार्थ्यांनी देखील याकामी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आह.े
नदीपात्रामध्ये औद्योगिक वसाहतींमधील रासायनिक प्रदषिू त पाण्याचे प्रवाह बंद करण्याचे देखील ठरले आह, महारा े ष्ट्र प्रदषू ण नियंत्रण मंडळ. एमआयडीसी आणि
अतिरिक्त अं बरनाथ मॅन्युफॅ क्चरिंग असोसिएशन (आमा) यांच्या संयुक्त बैठकीत रासायनिक पाणी अडवण्यासाठी चेक डॅमची व्यवस्था करण्याचे ठरले आहे. यामुळे कारखान्यांतील रासायनिक पाणी नदीत मिळण्याच्या प्रक्रियेला आळा बसणार आहे. नगरपालिकेच्या दालनात अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. धीरज चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये नुकतीच बैठक बोलावण्यात आली होती. त्यात रासायनिक पाणी अडवण्याचा निर्णय घेतला गेला. नदी स्वच्छता मोहिमेचा अर्धा टप्पा पूर्ण झाला असून उर्वरित ४० ते ४५ दिवसांत उर्वरित कामे पूर्ण झाल्यावर नदीकिनारी एक हजार १११ मोठी रोपे लावण्याचा निर्धार मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांनी व्यक्त केला आहे.
याबाबतची माहिती मिळताच अनेक व्यक्ती, संस्था यांनी लागणारी झाडे , आणि रोपे देण्याची तयारी दर्शवली आहे. लावण्यात येणारी रोपे दान स्वरुपात घ्यायची असून ती लावण्यासाठी पालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामार्फत खाजगी जागा वगळून श्रमदानातून वृक्षारोपण के ले जाणार आहे. के वळ झाडे न लावता ती जगवण्यासाठी लक्ष देण्याची गरज असून येत्या काही वर्षात घनदाट झाडीतून झुळझुळू वाहणारी वालधुनी नदी सर्वांनी के लेल्या कामाची आठवण करून देईल, लोकसहभाग आणि श्रमदानातून यावर्षी १४ फे ब्रुवारीपासून सुरु झालेली चळवळ ५ जूनला पर्यावरण दिनी रोपे लावून मोहिमेची सांगता के ली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली.