जिल्ह्यात दिवसभरात ३७ हजार नागरिकांचे लसीकरण

ठाणे : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज रात्री नऊपर्यंत ठाणे जिल्ह्यातील ३७,७९० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण एक कोटी २६ लाख ७७,३२१ डोसेस देण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६८ लाख २९,२७६ नागरिकांना तर ५७ लाख १३,९८० नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ३४,०६५ जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात ४०० लसीकरण केंद्र आयोजित करण्यात आले.