ठाणे : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज रात्री आठपर्यंत ठाणे जिल्ह्यातील २८,६१० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण एक कोटी २५ लाख ३६०१८ डोसेस देण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६८ लाख १४,९२० नागरिकांना तर ५५ लाख ९५,४७३ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख २५,६२५ जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात ३६१ लसीकरण केंद्र आयोजित करण्यात आले.