जिल्ह्यात दिवसभरात २६ हजार नागरिकांचे लसीकरण

ठाणे : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्यात कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज रात्री आठपर्यंत २६ हजार ९३२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८२ लाख ६२ हजार ५०३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून त्यापैकी ५४ लाख ९६ हजार ५०३ नागरिकांना पहिल्या डोसचे तर २७ लाख ६६ हजार ३५२ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात लसीकरणाचे सुमारे ४५० सत्र आयोजित करण्यात आले.