ठाणे : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज सायंकाळी सातपर्यंत ठाणे जिल्ह्यातील २४ हजार २१३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण एक कोटी २४ लाख १२,१३० डोसेस देण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६८ लाख १,५१२ नागरिकांना तर ५४ लाख ९८,४२८ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख १२,१९० जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात ३७५ लसीकरण केंद्र आयोजित करण्यात आले.