ठाणे : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज रात्री आठपर्यंत ठाणे जिल्ह्यातील १९,११३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण एक कोटी २७ लाख १४,२९७ डोसेस देण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६८ लाख ३२,६७८ नागरिकांना तर ५७ लाख ४५,४८६ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ३६,१३३ जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात ३२७ लसीकरण केंद्र आयोजित करण्यात आले.