जिल्ह्यात दिवसभरात १८०० नागरिकांचे लसीकरण

ठाणे: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज रात्री आठपर्यंत ठाणे जिल्ह्यातील १७७७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण एक कोटी २८ लाख ७८,३६२ डोसेस देण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६८ लाख ४८,३८९ नागरिकांना तर ५८ लाख ८६,८१६ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ४३,१५७ जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात ८९ लसीकरण केंद्र आयोजित करण्यात आले.