ठाणे : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज सायंकाळी सातपर्यंत ठाणे जिल्ह्यातील १७,६३३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण एक कोटी २६ लाख ९४,८८५ डोसेस देण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६८ लाख ३०,९०० नागरिकांना तर ५७ लाख २८,७८८ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ३५,१९७ जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात ३५७ लसीकरण केंद्र आयोजित करण्यात आले.