ठाणे : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज रात्री आठपर्यंत ठाणे जिल्ह्यातील १६ हजार ९५५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ कोटी २८ लाख ९५ हजार १३१ डोसेस देण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६८ लाख ४९ हजार ९०६ नागरिकांना तर ५९ लाख १ हजार ३३० नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४३ हजार ८९५ जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात ३११ लसीकरण केंद्र आयोजित करण्यात आले.