जिल्ह्यात दिवसभरात १६ हजार नागरिकांचे लसीकरण

ठाणे : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज सायंकाळी सायपर्यंत ठाणे जिल्ह्यातील १६ हजार १७० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ कोटी २८ लाख ३१ हजार ४६४ डोसेस देण्यात आले.

जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६८ लाख ४३ हजार ९५३ नागरिकांना तर ५८ लाख ४६ हजार ९२५ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४० हजार ५८६ जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात २९३ लसीकरण केंद्र आयोजित करण्यात आले