गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर बुधवारी जोरदार विजय मिळवल्यानंतर, यूपी वॉरियर्सचा आत्मविश्वास उंचावला आहे. त्यांचा WPL 2024 मधला पुढील सामना 1 मार्च रोजी बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरात जायंट्सशी होणार आहे. यूपी वॉरियर्सने या हंगामात तीन सामन्यांमध्ये पहिला विजय नोंदवला, तर गुजरात जायंट्सने अद्याप गुणतालिकेत आपले खाते उघडलेले नाही.
WPL मध्ये आमने सामने
यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स WPL 2023 मध्ये दोनदा भेटले आणि यूपी वॉरियर्स दोन्ही प्रसंगी विजयी झाले.
संघ
यूपी वॉरियर्स: अलिसा हिली (कर्णधार आणि यष्टिरक्षक), वृंदा दिनेश, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, दीप्ती शर्मा, सोफी एकलस्टोन, श्वेता सेहरावत, राजेश्वरी गायकवाड, पूनम खेमनार, सायमा ठाकोर, अंजली सर्वानी, गौहर सुलताना, चमारी अटापाटु, लक्ष्मी यादव, डॅनियल वायट, सोप्पधंडी यशश्री
गुजरात जायंट्स: बेथ मुनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), वेदा कृष्णमूर्ती, फीबी लिचफील्ड, हरलीन देओल, ॲश्ले गार्डनर, दयालन हेमलता, स्नेह राणा, तनुजा कंवर, कॅथरीन ब्राइस, लीआ ताहुहू, मेघना सिंग, लॉरा वोल्वार्ड, सायली सतघरे, मन्नत कश्यप, शबनम शकील, प्रिया मिश्रा, त्रिशा पूजिता, तरन्नुम पठाण
कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे
किरण नवगिरे: या उजव्या हाताच्या फलंदाजाने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या मागील सामन्यात यूपी वॉरियर्ससाठी फलंदाजीची सुरुवात केली आणि केवळ 31 चेंडूत सहा चौकार आणि चार षटकारांसह 57 धावा करत शानदार खेळी केली. नियमित सलामीवीर वृंदा दिनेशला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाल्याने तिला डावाची सुरुवात करता आली नाही, त्यामुळेच नवगिरेला सलामीला फलंदाजीची संधी मिळाली. तिने या संधीचे खरोखरच सोने केले.
ग्रेस हॅरिस: ऑस्ट्रेलियाच्या या अष्टपैलू खेळाडूने गुजरात जायंट्सविरुद्धच्या मागील सामन्यात यूपी वॉरियर्ससाठी बॅट आणि चेंडूने मौल्यवान योगदान दिले. ऑफ स्पिन गोलंदाजी करणारी हॅरिस हिने अंजली सरवाणीसह गोलंदाजीची सुरुवात केली आणि चार षटकात 20 धावा देऊन एक गडी बाद केला. नंतर फलंदाजी करताना केवळ 17 चेंडूत अर्धा डझन चौकार आणि एका षटकारासह 38 धावांची नाबाद खेळी झळकावली.
बेथ मुनी: गुजरात जायंट्सच्या कर्णधाराने या WPL 2024 च्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये मोठी धावसंख्या करू शकली नाही. ऑस्ट्रेलियाच्या या डावखुऱ्या सलामीच्या फलंदाजाला संघाच्या फलंदाजीची जबाबदारी स्वीकारावी लागेल कारण तिचे इतर सहकारी धावांपासून वंचित राहिले आहेत.
दयालन हेमलता: गुजरात जायंट्सची ही उजव्या हाताची मधल्या फळीतील फलंदाजाने गेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध तिच्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. तिने 25 चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकारासह नाबाद 31 धावा केल्या. डावाच्या अंतिम षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याची जबाबदारी तिच्यावर असेल.
खेळपट्टी
बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियम येथील परिस्थिती लक्ष्याचे पाठलाग करण्यासाठी अनुकूल आहे. या WPL 2024 मध्ये असे दिसून आले आहे कि नाणेफेक जिंकणारे कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्यास उत्सुक असतात. सामन्याच्या उत्तरार्धात जेव्हा दव पडतो तेव्हा गोलंदाजांना चेंडूवर नियंत्रण ठेवणे कठीण जाते ज्याचा फायदा फलंदाजांना मिळतो. बॅट आणि चेंडूमध्ये रोमांचक लढतीची अपेक्षा करा.
हवामान
हा दिवस तुलनेने दमट असून आर्द्रतेची टक्केवारी 43 असेल. तापमान 20 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. ढगांचे आवरण राहणार नाही आणि पावसाची शक्यता नाही. हवामान हवेशीर असेल.
सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: 1 मार्च 2024
वेळ: संध्याकाळी 7:30 वाजता
स्थळ: एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू
प्रसारण: जिओ सिनेमा, स्पोर्ट्स 18