मुंबई मॅरेथॉनसाठी दोन विशेष लोकल

ठाणे: मध्य रेल्वेच्या वतीने मुंबईत होणा-या टाटा मुंबई मॅरेथॉन २०२५ मध्ये सहभागी होण्यासाठी विशेष लोकल गाड्या चालविल्या जाणार आहेत. स्पर्धकांना या स्पर्धेत वेळेवर पोहचता यावे यासाठी मध्य रेल्वेच्या वतीने रविवारी, १९ जानेवारी २०१५ रोजी २ विशेष उपनगरीय सेवा चालविल्या जाणार आहेत.

विशेष ट्रेन कल्याण येथून ३ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ४.३० वाजता पोहोचणार आहे. हार्बर मार्गावर पनवेल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ट्रेन पनवेल येथून ३.१० वाजता सुटणार असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ४.३० वाजता पोहोचेल.

या दोन्ही विशेष गाड्या मार्गावरील सर्व स्थानकांवर थांबतील. स्पर्धक तसेच प्रवाशांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.