लोकमान्य नगरमध्ये दोन दुकानांना आग

ठाणे : येथील लोकमान्यनगर पाडा नं. २ या ठिकाणी दोन दुकानांना आग लागली होती. त्यात जवळील तीन गाळे आगीत भस्मसात झाले आहेत.

गाळा क्र. एक येथे गादीच्या दुकानाच्या पहिल्या व दुस-या मजल्यावर आग लागून नुकसान झाले आहे. ही घटना १२ डिसेंबर रोजी घडली. याबाबतची माहिती सायंकाळी साडेपाच वाजता आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली.

गाळा क्र. दोनमध्ये इम्पोरियम आणि तळ मजल्यावर कपड्याच्या दुकानाला आग लागून नुकसान झाले आहे. घटनास्थळी महावितरण कंपनीचे कर्मचारी, वर्तकनगर पोलीस कर्मचारी, अग्निशमन दल, फायर वाहन व रेस्क्यू वाहनांसह तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी १, पिकअप वाहनासह उपस्थित होते. घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.