ठाण्याच्या ईशान हडकरची कॅलिफोर्नियात दमदार कामगिरी
ठाणे: ठाण्यातील प्रतिभावान तरुण ईशान हडकर सध्या कॅलिफोर्निया विद्यापीठ, इर्विन येथून बिझनेस ॲनालिटिक्समध्ये पदव्युत्तर पदवी घेत असून त्याने समुद्रसपाटीपासून १३ हजार फूट उंचीवरून स्कायडायव्हिंग करताना दोन रुबिक्स क्यूब सोडवून इतिहास रचला आहे.
११ एप्रिल २०२५ रोजी कॅलिफोर्नियातील ओशनसाइड येथे साध्य झालेले हे उल्लेखनीय यश एक महत्त्वाचा टप्पा आहे. समुद्रसपाटीपासून १३ हजार फूट उंचीवर पाण्याखाली, जमिनीवर आणि हवेत अशा तीन नैसर्गिक घटकांमधून रुबिक्स क्यूब सोडवणारा ईशान हा जगातील एकमेव व्यक्ती बनला आहे.
इशानने याआधी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येदोन राष्ट्रीय विक्रम नोंदवले आहेत. यात स्कूबा डायव्हिंग करताना सर्वात जलद रुबिक्स क्यूब सोडवल्याचा आणि एकाच सत्रात पाण्याखाली सोडवलेल्या रुबिक्स क्यूबची जास्तीत जास्त संख्या (मार्च २०२४) असल्याचा समावेश आहे.
या स्कायडायव्हिंग रेकॉर्डसह आता तिन्ही घटकांमध्ये रुबिक्स क्यूब सोडवल्याबद्दल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ईशानची नोंद होणार आहे.