ठाणे : जिल्ह्यातील नवीन कोरोना रूग्ण थोडे थोडे वाढत असून आज दोन नवीन रुग्णांची भर पडली. पाच दिवसानंतर ठाण्यात एक रूग्ण सापडला आहे तर एक जण कोरोनामुक्त झाला आहे.
जिल्ह्यात ठाणे महापालिका आणि बदलापूर नगरपालिका येथे प्रत्येकी एक रूग्ण सापडला आहे. जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी मात्र एकही रूग्ण नोंदला गेला नाही.
आत्तापर्यंत सात लाख ४७,४२०जण बाधित सापडले आहेत. रुग्णालयात आणि घरी १३जणांवर उपचार सुरू आहेत तर सात लाख ३६,२०८जण रोगमुक्त झाले आहेत. ठाण्यात एक रूग्ण रोगमुक्त झाला आहे. आत्तापर्यंत एक लाख ९५,२६६ रूग्ण ठाण्यात रोगमुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात ११,९६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.