ठाणे: शहरातील नवीन कोरोना रूग्णवाढ रोडावली असली तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आज दोन नवीन रुग्णांची भर पडली तर एक जण रोगमुक्त झाला आहे महापालिका हद्दीत माजिवडे-मानपाडा आणि वागळे प्रभाग समिती क्षेत्रात प्रत्येकी एक नवीन रूग्ण सापडला आहे तर उर्वरित सात प्रभाग समिती परिसरात एकही रूग्ण नोंदवला गेला नाही.
व ि व ि ध रुग्णा ल य ा त उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रूग्णांपैकी एक जण रोग मुक्त झाला आहे. आत्तापर्यंत एक लाख ८१,५५९रूग्ण ठणठणीत बरे
होऊन घरी गेले आहेत तर मागील आठवड्यात सक्रीय रुग्णांचा आकडा दहाच खाली आला होता, तो आज १८वर जाऊन पोहचला आहे. आज भर पडलेल्या दोन्ही रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या चार झाली आहे तर घरी १४जणांवर उपचार सुरू आहेत. आज एकही रूग्ण दगावला नसून आत्तापर्यंत २,१२७ रुग्णांचा मृत् झयू ाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील १७० नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये दोन जण बाधित सापडले आहेत. आत्तापर्यंत २४ लाख ८,३६८ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये एक लाख ८३,७०५जण बाधित मिळाले आहेत.