ठाणे : शहरातील कोरोना रूग्ण वाढीची गती मंदावली असून आज दोन नवीन रुग्णांची भर पडली तर एक जण कोरोनामुक्त झाला आहे.
महापालिका क्षेत्रात उथळसर आणि कळवा प्रभाग समिती भागात प्रत्येकी एक रूग्ण वाढला आहे. उर्वरित सात प्रभाग समिती परिसरात एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. आत्तापर्यंत एक लाख ८१,५३८जण ठणठणीत बरे झाले आहेत तर रुग्णालयात आणि घरी १५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज एकही रूग्ण दगावला नसून आत्तापर्यंत २,१२७ जणांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील ५२८ नागरिकांची चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये दोन जण बाधित मिळाले. आत्तापर्यंत २४ लाख ४,२३६ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८३,६८०जण बाधित सापडले आहेत.