बँकेच्या शाखांची एकूण संख्या झाली एकशे बासष्ट
ठाणे: टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड या देशातील नागरी सहकारी क्षेत्रातील अग्रगण्य बहुराज्यीय बँकेने आपल्या सातत्यपूर्ण प्रगतीच्या मार्गावर आणखी एक पाऊल टाकले आहे. टीजेएसबी बँकेने सोमवार ३ नोव्हेंबर रोजी डोंबिवली (पश्चिम) येथील मोठागाव आणि ठाकुर्ली येथे दोन नवीन शाखांचे उद्घाटन केले. या दोन नवीन शाखांमुळे टीजेएसबी बँकेच्या शाखांची संख्या आता १६२ झाली आहे.
मोठागाव शाखा डोंबिवली पश्चिमेतील वाढती निवासी संख्या लक्षात घेऊन सुरु करण्यात आली आहे. स्थानिक रहिवाशांची गरज लक्षात घेऊन शाखा कार्यरत झाली आहे. या परिसरात नजीकच्या काळात वाढणाऱ्या दळणवळणाचा अंदाज घेऊन स्थानिकांना बँकिंग व्यवहार सुलभपणे करता यावेत यासाठी या शाखेची स्थापना करण्यात आली आहे. मोठागाव येथील बँकेच्या नव्या शाखेमुळे परिसरातील रहिवाशांना आधुनिक बँकिंग सेवांचा लाभ घेता येईल. डोंबिवली पश्चिम भागातील टीजेएसबी बँकेचा प्रभाव अधिक विस्तारण्यास मदत होईल.
मध्य रेल्वे मार्गावरील ऐतिहासिक रेल्वे वसाहतीच्या वारशासाठी ओळखले जाणारे ठाकुर्लीची ओळख आता व्यावसायिक आणि निवासी अशी होत आहे. येथील बैंकिंग गरज लक्षात घेऊन शाखा सुरु केली आहे.
या दोन नवीन शाखांमुळे टीजेएसबी बँक ठाणे जिल्ह्यासह एमएमआरडीए क्षेत्रात अधिक सक्षम झाली आहे. टीजेएसबी सहकारी बँकेच्या शाखांचे जाळे महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये १६२ शाखांपर्यंत विस्तारलेले आहे.
दोन नव्या शाखांच्या उद्घाटनाच्या निमित्त बोलताना, बँकेचे अध्यक्ष शरद गांगल म्हणाले, टीजेएसबी बँकेचे ध्येय अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचणे आणि आमच्या सेवामध्ये सतत सुधारणा करणे हे आहे. मोठागाव आणि ठाकुर्ली शाखांमुळे सहकार चळवळ अधिक बळकट होण्यास मदत होईल. ग्राहकांसाठी बँकिंग सुविधा त्यांच्या थेट दारापर्यंत नेण्याचा हा प्रयत्न आहे.”
बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर म्हणाले, “या नवीन शाखा म्हणजे केवळ भौतिक विस्तार नाही. बँकेच्या अत्याधुनिक सेवांच्या आधारे ग्राहकांच्या आर्थिक सबलीकरणाचे द्योतक आहे. टीजेएसबी बँकेकडे कॉर्पोरेट, रिटेल बैंकिंग, फॉरेक्स सेवा तसेच डिजिटल बैंकिंग असा विविध बँकिंग सुविधा एकत्र देण्याची व्यवस्था आहे. यातून ग्राहकांच्या निरनिराळ्या आर्थिक गरजांची पूर्तता करून, त्यांच्या प्रगतीत भागीदार म्हणून बँकेचा सातत्यपूर्ण सहभाग राहतो.”
१९७२ साली स्थापन झालेली टीजेएसबी सहकारी बैंक लि. ही देशातील अग्रगण्य बहुराज्यीय नागरी सहकारी बँकांपैकी एक आहे. ठाणे येथील मुख्यालयातून कार्यरत असलेली ही बँक महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये पसरलेल्या १६२ शाखांद्वारे सात लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा पुरवत आहे. विश्वास, नवोन्मेष आणि ग्राहकसेवा या मूल्यांच्या आधारे आधारित असलेली बैंक रिटेल, कॉर्पोरेट, फॉरेक्स तसेच डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून आधुनिक आणि सुलभ सेवा पुरवते. सहकाराच्या तत्वाचे जतन आणि दूरदृष्टी यातून टीजेएसबी बँक आपल्या ग्राहकांना व्यवसायिक मूल्याधारित आर्थिक समाधान देत त्यांना सशक्त करण्याच्या ध्येयाशी कटिबद्ध आहे.