ठाणे : अंबरनाथ येथील शिवाजीनगर पोलीस स्थानकातील दोन हवालदारांनी भंगाराची गाडी सोडवण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्विकारल्याची घटना घडली आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
चंद्रकांत शिंदे (४४) आणि सचिन माने (४३) अशी आरोपींची नावे असून त्यांची नियुक्ती शिवाजीनगर अंबरनाथ येथे आहे. या घटनेसंबंधी, तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीत तक्रारदार यांची भंगाराची गाडी पकडून त्यावर कारवाई न करण्यासाठी आणि ती गाडी सोडवण्यासाठी दोन्ही लोकसेवकांनी तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने १२ एप्रिल २०२४ रोजी केलेल्या पडताळणी कारवाईत लोकसेवकांनी एक लाख रुपयांची मागणी केली होती आणि नंतर तडजोड अंती ५० हजार रुपये मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.