५५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

ठाणे : आगामी लोकसभा निवडणूक पारदर्शक व्हावी याकरिता निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ठाणे पोलिस आयुक्तालय हद्दीतील पोलीस निरीक्षकापासून पोलीस उप निरीक्षक असलेल्या तब्बल ५५ अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या आहेत.

ठाणे पोलीस आयुक्तालयात तीन वर्षापेक्षा जास्त कार्यकाल सेवा केलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे निवडणूक पारदर्शक होण्याची शक्यता कमी असल्याने केंद्रीय निवडणूक विभागाने अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ठाणे पोलिस आयुक्तातील ३८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात कळवा पोलीस ठाण्याचे कन्हैयालाल थोरात, नौपाडा पोलिस ठाण्याचे रविंद्र क्षीरसागर, दिलीप फुलपगार, अशोक कडलग, निवृत्ती कोल्हटकर, जितेंद्र कुंवर, विद्या पाटील आदींचा समावेश आहे. बदली करण्यात आलेल्या सहा सहायक पोलीस निरीक्षकांमध्ये चेतन बागुल, रामा धोंडगा, तृप्ती आठवले, आदींचा समावेश आहे. ११ पोलीस उपनिरीक्षकांची देखिल बदली करण्यात आली आहे. या पोलीस अधिकाऱ्यांची मुंबई, नागपूर, नाशिक तसेच कोकण परिक्षेत्रात बदली करण्यात आली आहे. आणखी काही वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या देखिल बदल्या होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.