वाहतूक पोलिसाला मद्यापीकडून बेदम मारहाण

ठाणे : माजिवडे नाका येथील उड्डाणपूल येथे आपले कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसाला एका दारुड्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे

श्री. कांदे असे मारहाण करण्यात आलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी ७च्या दरम्यान ते आपले कर्तव्य बजावत असताना दारू पिऊन आलेल्या आरोपीने त्यांच्याशी वाद घालून त्यांना मारहाण केली. तेथे असलेली वीट त्यांच्या डोक्यावर मारली. त्यामध्ये जबर जखमी झालेल्या पोलीस शिपाई श्री. कांदे यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की आरोपीच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल.