ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रातील पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरुत्व जलवाहिनीचे तातडीचे देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे
शुक्रवार १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते रात्री १२ वाजेपर्यंत ठाणे महानगरपालिकेतील दिवा प्रभाग समिती व मुंब्रा प्रभाग समितीमधील मुंब्रा बायपासपासून मुंब्रा फायरब्रिगेड पर्यंत (किस्मत कॉलनी, चांद नगर, एम. एम. व्हॅली, अमृत नगर, अल्मास कॉलनी) तसेच कळवा प्रभाग समितीमधील काही भाग व कोलशेत मधील काही परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा व ठाणे महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.