ठाणे: दिवा शहर आणि परिसरात होणाऱ्या विविध विकास कामांचा लोकार्पण आणि भुमिपूजन सोहळा बुधवार 7 जून 2023 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती शिवेसना दिवा शहर प्रमुख आणि माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी दिली आहे.
पुरातन खिडकाळेश्वर मंदिर सुशोभिकरणाचे भुमिपूजन, आगरी कोळी वारकरी भवन भुमिपूजन, दिवा शहरातील धर्मवीर नगर, दिवा आगासन रोड दिवा येथे नवीन मुख्य जलवाहिनीचे लोकार्पण, दिवा आगासन मुख्य रस्ता, आरोग्य केंद्र, दातिवली गाव येथे व्यायाम शाळा, खुला रंगमंच, साबे गाव येथील शाळा या कामाचा लोकार्पण सोहळा तर आगासन देसाई खाडी पुल, सामाजिक भवन धर्मवीर नगर, दातिवली तलाव सुशोभिकरण, दिवा शीळ रोड, देसाई गाव तलाव या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी दिवा शहरातील नागरिकांतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विशेष नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या सोहळयास स्थानिक खासदार डॉ श्रीकांत शिंदे, शिवसेना प्रवक्ते तथा समन्वयक नरेश म्हस्के, ठाणे जिल्हा महिला संघटक मिनाक्षीताई शिंदे, कोपरी पाचपाखाडी विधानसभा शहर प्रमुख राम रेपाळे, उपशहर प्रमुख व माजी नगरसेवक शैलेश पाटील, माजी नगरसेवक अमर पाटील, दिपक जाधव, माजी नगरसेविका दर्शना चरणदास म्हात्रे, सुनीता मुंडे, दिपाली भगत, शहर अधिकारी युवती सेना साक्षी मढवी आदी पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.