ठाणे : कोरोनाच्या साथीने डोके वर काढले असताना समाजात भीतीचे वातावरण पसरले आहे. परंतु घाबरून जाण्याऐवजी योग्य काळजी घेतली तर कोरोनाला आपण पायबंद घालू शकू, असे आयुर्वेद तज्ञ डॉक्टर उदय कुलकर्णी यांनी सांगितले.
‘ठाणेवैभव’शी बोलताना डॉक्टर कुलकर्णी म्हणाले, ज्या चुका आपण पहिल्या तीन लाटांमध्ये केल्या त्याची पुनरावृत्ती टाळायला हवी. यासाठी विषाणू ज्या मार्गाने शरीरात प्रवेश करतो त्या नाकाची योग्य काळजी घ्यायला हवी. घरातून बाहेर पडताना नाकाच्या आत तूप लावावे. यामुळे विषाणूचा पुढचा प्रवास थांबवता येऊ शकतो.
अशक्तपणा जाणवत असेल, पचनावर परिणाम झाला असेल किंवा सर्दी झाली असेल तर विशेष लक्ष द्यावे, असे सांगून डॉक्टर कुलकर्णी यांनी वाफ घेण्यावर भर दिला. सुवर्णप्राशनाचा उपचार उपयुक्त ठरेल असेही ते म्हणाले.