ठाणे : ठाणे महापालिकेत ६ मार्च पासून प्रशासकीय राजवट लागू झाल्यानंतरही येथील महापौर कार्यालयासह इतर पक्ष कार्यालये सुरुच होती.
अखेर उशिराने का होईना पालिका प्रशासनाला अखेर जाग आली आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी आदेश देत ही कार्यालये तत्काळ बंद करण्याच्या सुचना संबधित विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार गुरुवारी येथील सर्वच पक्ष कार्यालयांना टाळे लावण्यात आले.
महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा पाच वर्षाचा कार्यकाळ हा ५ मार्च रोजी संपुष्टात आला. त्यानंतर महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाली आहे. परंतु असे असतांनाही महापालिकेतील विविध पक्षांची पक्ष कार्यालये मात्र सुरु होती. त्यामुळे पद जाऊनही अनेक पदाधिकारी या ठिकाणी दिवसभरात फेरी मारुन जात होते. तर काही पदाधिकारी तासनंतास येथे बसत होते. वास्तविक पाहता कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर अशा पदाधिका:यांनी महापालिकेतील पक्ष कार्यालयात येणो अपेक्षित नाही. परंतु तरी देखील ते येत असल्याने पालिकेतील कर्मचा:यांना त्यांच्या सेवेसाठी हजर राहावे लागत होते. त्यांच्या चहापानाचा व इतर खर्च देखील पालिकेलाच करावा लागत होता. तसेच वीजेचा अपव्यय देखील होत होता, शिवाय कर्मचारी वर्ग देखील तेथील कामात व्यस्त असल्याचेच दिसत होते.
परंतु महापालिका आयुक्तांच्या ही बाब निर्दशनास येताच, त्यांनी आता ही पक्ष कार्यालये तत्काळ बंद करण्याचे आदेश संबधींत विभागाला दिले आहेत. त्यानुसार गुरुवारी येथील कामकाज बंद करुन वीज प्रवाह देखील बंद करण्यात आला. तसेच महापालिका मुख्यालयातील तळ मजल्यासह तिस:या मजल्यार्पयत असलेल्या सर्वच पक्ष कार्यालयांना टाळे लावण्यात आले. तसेच येथील स्टाफ आता इतर विभागात हलविण्यात आला आहे. त्यामुळे आता विविध कामे घेऊन आजही आपल्या नेत्याला, लोकप्रतिनिधीला भेटण्यासाठी येणा:या त्यांच्या कार्यकत्र्याची आणि नागरीकांना मात्र त्यांचा इतर ठिकाणी शोध घ्यावा लागणार आहे.
यांनी राखला सन्मान
महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाल्यानंतर विविध पक्ष कार्यालयातून पदाधिका:यांनी काढता पाय घेतला. किंबहुना त्या ठिकाणी न जाता अधिका:यांच्या कॅबीनमध्ये काही पदाधिकारी जात होते. प्रशासकीय राजवट लागू झाल्याने अशोक वैती, संजय भोईर यांनी महापालिकेतील पक्ष कार्यालयात हजेरी लावली नाही. किंबहुना त्यांच्या जवळ आधी असलेल्या खुर्चीवर देखील ते बसले नाहीत.